टाकळीहाजी -पिंपरखेड (ता. शिरूर) येथे एक 25 वर्षीय महिला कोरोना बाधित सापडल्याची माहिती टाकळीहाजी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. प्रदीप बिक्कड यांनी दिली. काही दिवसांपूर्वी ही महिला आर्वी पिंपळगाव (ता. जुन्नर) येथे आपल्या माहेरी जाऊन आली होती.
मात्र डॉ. प्रदीप बिक्कड यांना संपर्क केला असता त्या कुटुंबातील व्यक्ती कोठेही गेलेल्या नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडून देण्यात आल्याचे बिक्कड यांनी सांगितले. उद्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची तपासणी व त्रास होणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेणार असून संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेण्यात येणार आहे