मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीत पुन्हा एकदा नाराजीचे सुरु उमटले आहेत. आज काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर बैठक झाली. निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेत नसल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित होते.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी सवांद साधला, निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील करण्याचा प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत. राज्याचे काही प्रश्न घेऊन आज आमची बैठक झाली. चक्रीवादळ झालं, त्या पाहणीसाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत.