जामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

जामखेड (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचे जामखेड तालुका राष्ट्रवादीतून जोरदार पडसाद उमटत पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत, असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, सुरेश भोसले, वैजिनाथ पोले, विजयसिंह गोलेकर, नगरसेवक पवनराजे राळेभात, अमित जाधव, दिंगबर चव्हाण, प्रशांत राळेभात, अविनाश पवार, उमर कुरेशी, काकासाहेब कोल्हे, सचिन डोंगरे, प्रकाश काळे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.