नवी दिल्ली : गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील सारीगम जीआयडीसी येथे एका कंपनीत झालेल्या स्फोटामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळी चावकार्य सुरू करण्याची सुरू आहे.
सरिगाम G.I.D.C. वेन पेट्रोकेम अँड फार्मा (इंडिया) प्रा. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने कंपनीला भीषण आग लागली. शिवाय बॉयलरच्या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की कंपनीची तीन मजली इमारत क्षणार्धात कोसळली.इमारत कोसळल्याने दोन जण जखमी झाले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबलेअसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Valsad, Gujarat| 2 died & 2 injured in a blast occurred at a company in Sarigam GIDC around 11 pm yesterday night. Reason of the blast is unknown. Rescue operation has been stopped temporarily, to be resumed in the morning. Dead bodies are yet to be identified: SP, Valsad pic.twitter.com/CzOnNetah5
— ANI (@ANI) February 27, 2023
अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्य सुरु केले. दरम्यान भिलाड पोलिसांच्या ताफ्यानेही घटनास्थळी पोहोचून लोकांची गर्दी बाजूला करुन बचाव कार्य सुरु केलं. पालघर जिल्ह्याजवळच्या वलसाड तालुक्यातील सरिगाम जीआयडीसीमधील कंपनीत रात्री अकरा ते बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कंपनीत बॉयलरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की कंपनीची तीन मजली इमारत कोसळली.
पहाटे चार वाजेपर्यंत ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. शिवाय या स्फोटाचं कारण देखील अजून अस्पष्ट आहे. बचाव कार्य अजूनही सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.