Mahesh Gaikwad health Update : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते.
तब्बल 24 दिवसानंतर आज महेश गायकवाड यांना घरी सोडण्यात आले आहे.उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादावरून एकूण १० गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. | Mahesh Gaikwad health Update
त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान आज त्यांना डिस्चार्ज मिळाला.त्यामुळे आता गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढणार आहेत. | Mahesh Gaikwad health Update
महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर चात्यांकडून मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणाहून बॅनरबाजी तसेच शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने कायदा सुव्यवस्था बघता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. | Mahesh Gaikwad health Update