Sharad Pawar on Raigad। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यात कपबशी, वटवृक्ष आणि तुतारीचा समावेश होता. निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले.
शरद पवार याच चिन्हाचे अनावरण शनिवारी किल्ले रायगडवरुन करण्यात आलं. यादम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे. तुम्ही तुताऱ्या वाजवा… नाहीतर मशाली पेटवा. पण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 45 पेक्षा जास्त जागा आम्ही निवडणूक आणू, असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटावर टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले,’तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा. परंतु महाराष्ट्रात 45 आम्ही म्हणत होतो, पण तेही आता आम्ही क्रॉस करू अशी दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढत आहे. मोदींची जात, पात, धर्म, गट यांच्या पुढे गेलेले आहेत. मोदीजींनी लाभार्थी नावाचा गट निर्माण केला आहे. आणि तो असा म्हणतो की, विरोधी पक्षांचे राजकारण आता बास. आम्हाला फक्त मोदीजी पाहिजेत. त्याचा प्रत्यय आता दिसत आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका, तीन राज्यातील निवडणुकीत भाजपला यश मिळाले, असेही ते म्हणाले आहे