Modi vs Manmohan Govt। भारताच्या आर्थिक विकासाच्या गतीवर काँग्रेसने शनिवारी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. आर्थिक विकास म्हणजे शेतीपासून उद्योग आणि सेवांमध्ये रोजगाराचे विविधीकरण. अशी व्याख्या काँग्रेसने सांगितली. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशाने केलेली प्रगती नरेंद्र मोदी सरकारने उलटवून लावल्याचा दावा काँग्रेसने केलाय.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरएक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये, ‘2004-05 आणि 2017-18 दरम्यान भारतातील कृषी कामगारांची संख्या 6.7 कोटींनी कमी झाली होती. हे घडले कारण कामगारांनी उत्पादन आणि सेवांमध्ये जास्त पगाराच्या नोकऱ्यांसाठी कमी पगाराच्या कृषी नोकऱ्या सोडल्या. ही ऐतिहासिक कामगिरी होती आणि भारताला मध्यम-उत्पन्न देश बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान होते.असे म्हटले.
जयराम रमेश म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशाने केलेली प्रगती पंतप्रधान मोदींच्या अन्यायाच्या तीन वर्षात जवळपास पूर्णपणे उलटली आहे. 2018-19 पासून कृषी कामगारांच्या संख्येत 6 कोटींनी वाढ झाली आहे आणि हे कोविड-19 महामारीच्या आधीही होत होते.
देश 20 वर्षे मागे ढकलला Modi vs Manmohan Govt।
आर्थिक विकास म्हणजे शेतीपासून उद्योग आणि सेवांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवणे. हाच क्रम सर्व देश पाळतात. भारतानेही तो आत्तापर्यंत पाळला. भारताला समृद्धीच्या मार्गावर नेण्याऐवजी पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण चुकीच्या धोरणांनी आणि गैरव्यवस्थापनामुळे आपली आर्थिक सुधारणा 20 वर्षांनी मागे पडली, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
‘काँग्रेसनेच ममता यांना खासदार केले’ Modi vs Manmohan Govt।
टीएमसीसोबत जागा वाटपावर काँग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “चर्चा सुरू आहे. टीएमसीसाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत. ममता बॅनर्जी आणि टीएमसीने म्हटले आहे की त्यांना इंडिया आघाडी मजबूत करायची आहे. भाजपचा पराभव करणे हे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे. दोन्ही पक्षांमध्ये मतभेत आहेत पण आम्ही ममता बॅनर्जींचा आदर करतो.” असे त्यांनी म्हटले.
त्यासोबतच “काँग्रेसने त्यांना नेहमीच आदर दिला आहे. काँग्रेसनेच त्यांना खासदार बनवले आणि काँग्रेससोबत त्यांची खूप प्रगती झाली. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी पक्ष सोडला, पण आजही त्यांच्या पक्षाचे नाव तृणमूल काँग्रेस आहे. पक्ष सोडल्यानंतरही त्यांची विचारधारा काँग्रेसशी जोडलेली आहे.