मुंबई – देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात करोना रग्णामध्ये वाढ होत आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये करोनाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. असे असताना आज भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीष महाजन यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
महाजन यांना करोनाची सौम्य लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांनी आपली करोना चाचणी करून घेतली त्यामध्ये त्यांचा करोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांनी घरातच विलगीकरण करून घेतले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पद्धती चालू केली आहे.