BJP-BJD Alliance । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीजेडी आणि भाजपमध्ये जागावाटपाबाबत चर्चा अद्याप प्रलंबित आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागेवरून दावेदारी होणार असल्याची चर्चा आहे. विशेषत: विधानसभेच्या जागांवर, कारण लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही पक्षातील आघाडीचा पेच निर्माण झालाय.
दिल्लीतील बीजेडीसोबत निवडणूकपूर्व युती आणि जागा वाटपाची चर्चा अनिर्णित राहिल्यानंतर, ओडिशा भाजपने ते राज्यातील सर्व 147 विधानसभा आणि 21 लोकसभेच्या जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतात, असा दावा केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी याविषयी वक्तव्य केलं. त्यांनी “युतीवर कोणतीही चर्चा झाली नाही आणि भाजप एकट्याने निवडणूक लढवेल.” असे म्हणाले. दिल्लीतील बैठक संपल्यानंतर समल पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांसह राष्ट्रीय राजधानीतून भुवनेश्वरला परतले होते.
बीजेडीने मौन पाळले BJP-BJD Alliance ।
बीजेडी नेते व्हीके पांडियन आणि प्रणव प्रकाश दास हेही भुवनेश्वरला परतले. भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत निवडणूकपूर्व युतीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दोघेही गुरुवारी संध्याकाळी चार्टर्ड फ्लाइटने दिल्लीत पोहोचले होते. परतताना त्यांनी जागावाटप सारख्या चर्चेबाबत मौन बाळगलं आहे.
जागा वाटपावरून मतभेद BJP-BJD Alliance ।
दरम्यान,ओडिशातील सत्ताधारी बीजेडी आणि विरोधी भाजप यांच्यातील युतीच्या चर्चेत जागावाटपावरून अडथळे येत आहेत. दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती करण्यास सहमती दर्शवली असली तरी जागावाटपाबाबत मतभेद होते. भगवा कॅम्पमधील सूत्रांनी दावा केला की बीजेडीने 147 सदस्यीय ओडिशा विधानसभेत 100 हून अधिक जागांवर लढण्याची मागणी केली होती, परंतु हे भाजपला मान्य नव्हते.भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “बीजेडी विधानसभेच्या 75 टक्के जागांची मागणी करत आहे, जी आम्हाला मान्य नाही.”
भाजपने किती जागा मागितल्या?
दुसरीकडे, भाजपने ओडिशातील लोकसभेच्या 21 पैकी 14 जागा मागितल्या होत्या, त्या बीजेडीने नाकारल्या आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीजेडीने 12 जागा जिंकल्या होत्या तर भाजपने आठ जागा जिंकल्या होत्या. बीजेडीच्या एका वरिष्ठ नेत्याने “आम्ही लोकसभेच्या 10 पेक्षा कमी जागा लढवल्या तर ते आमच्यासाठी आत्मघातकी ठरेल.” असे म्हटले.