नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी ही ‘लाईव्ह’ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे.
सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर होणार आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे. ‘बार अँड बेंच’ने याबाबतची माहिती दिली आहे.
घटनापीठासमोरील या खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा निर्णय सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘फूल कोर्ट मीटिंग’मध्ये घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीवेळी लाईव्ह स्ट्रिमिंग केले होते. त्यावेळी ते नॅशनल इन्फॉर्मेटिंक्स सेंटर या सरकारी संस्थेच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आले होते.