Big Bash League – सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग ही टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. काही दिवसांपूर्वी याच स्पर्धेतील सिडनी थंडर्स आणि एडिलेड स्ट्रायकर्स यांच्यातील सामन्यात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली होती. त्या सामन्यात सिडनी थंडर्सचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अवघ्या १५ धावांतच सर्वबाद झाला होता. त्यानंतर आता होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात झालेल्या सामन्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. कारण या सामन्यादरम्यान घडलेल्या एका प्रकारामुळे मॅथ्यू वेड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
#INDvsBAN | उमेश, अश्विनची जबरदस्त गोलंदाजी; बांगलादेश २२७ धावांत गारद तर भारत…
या सामन्यात पर्थ संघाचा फलंदाज फाफ डुप्लेसीस हा फलंदाजी करताना फिरकी गोलंदाजासमोर त्रिफळाचित झाला. यानंतर तो गोलंदाजांवर नव्हे तर यष्टींच्या पाठीमागे असलेल्या मॅथ्यू वेडवर अत्यंत नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. हे पाहून चाहत्यांना प्रश्न पडला की, नेमकं त्यावेळी काय घडलं असेल. मात्र, सामना संपल्यानंतर मॅथ्यू वेडने फाफ डुप्लेसीसच्या बाबतीत झालेल्या चुकीबाबत प्रतिक्रिया दिली.
#INDvsBAN | उमेश, अश्विनची जबरदस्त गोलंदाजी; बांगलादेश २२७ धावांत गारद तर भारत…
होबार्ट संघाचा कर्णधार असलेल्या मॅथ्यू वेडने त्याच्या चुकीबाबत फाफ डुप्लेसीसची माफीही मागितली. त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मला वाटते की तो नाराज झाला होता. मला माहित नाही की मी किती वेळ अगोदर बोल्ड असे म्हटलो होतो, परंतु त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे.” फाफ डुप्लेसीस बाद झाला तेव्हा थोडा वेळ अगोदर यष्टीमागे असलेल्या वेडने बोल्ड असे म्हटले होते. त्यानंतर पुढच्या काही सेकंदातच फाफ बोल्ड आऊट झाला. त्यामुळे फाफने त्या प्रकाराबद्दल नाराजी दर्शवली होती.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना होबार्ट संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पर्थ संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १६४ धावा करता आल्या. त्यामुळे होबार्ट संघाने हा सामना ८ धावा राखून जिंकला. मात्र, या सामन्यानंतर मॅथ्यू वेडच्या गैरवर्तनाची सध्या चर्चा सुरु आहे.