Big Bash League – ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग ही टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या सिडनी थंडर्स आणि एडिलेड स्ट्रायकर्स यांच्यातील सामन्यात एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एडिलेड स्ट्रायकर्स संघाने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १३९ धावा केल्या होत्या. त्यामुळे सिडनी थंडर्सचा संघ या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र, घडले वेगळेच आणि टी-२० क्रिकेटमधील अनोख्या विक्रमाची नोंद झाली.
#RanjiTrophy । महाराष्ट्राचा दिल्लीवर दणदणीत विजय; स्पर्धेत विजयी सलामी
एडिलेड स्ट्रायकर्सने दिलेल्या १४० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सिडनी थंडर्सचा संघ अवघ्या १५ धावांत सर्वबाद झाला. हे तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल असेल, मात्र सामन्यात असेच घडले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याचा लाजिरवाणा विक्रम आता सिडनी थंडर्सच्या नावावर झाला आहे. याअगोदर २०१९मध्ये टर्कीचा संघ झेक प्रजासत्ताकविरुद्ध २१ धावांवरच सर्वबाद झाला होता.
#RanjiTrophy । महाराष्ट्राचा दिल्लीवर दणदणीत विजय; स्पर्धेत विजयी सलामी
अॅडलेड स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून ख्रिस लिनने ३६ आणि कॉलिन डी ग्रँडहोमने ३३ धावांच्या खेळी केल्या. त्याचबरोबर इतर काही फलंदाजांच्या छोट्या खेळीमुळे संघाने २० षटकांत ९ गडी गमावून १३९ धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे सिडनी थंडर्स संघाकडे अॅलेक्स हेल्स, रिली रोसोवू सारखे स्टार फलंदाज असल्याने ते हा सामना सहज जिंकतील असे वाटत होते.
8-10 of 5 🤯🤯🤯🤯🤯🤯🤯
— Ben Stokes (@benstokes38) December 16, 2022
मात्र, कागदावर चमकणाऱ्या सिडनी थंडर्सच्या फलंदाजीला असे ग्रहण लागले की, अख्खा संघ १५ धावांतच गारद झाला. संघाच्या कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्याचबरोबर संघाच्या ५ फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे संपूर्ण संघ ५.५ षटकात १५ धावा करून तंबूत परतला. एडिलेड स्ट्रायकर्स संघाकडून हेन्री थॉर्नटनने ३ धावांत ५ बळी घेतले. तर वेस अॅगरने ६ धावांत ४ बळी घेतले. तसेच मॅथ्यू शॉर्टने ५ धावा देत १ बळी घेतला.
DO NOT SCRATCH YOUR EYES #BBL12 pic.twitter.com/dhmQucBxrn
— KFC Big Bash League (@BBL) December 16, 2022
Sydney Thunder bowled out for 15 (!) in #BBL by Adelaide Strikers – the lowest total ever in T20 cricket!
Lowest men’s T20 totals (completed innings):
15 – Thunder v Strikers (today)
21 – Turkey v Czech Republic
26 – Lesotho v Uganda
28 – Turkey v Luxembourg— Lalith Kalidas (@lal__kal) December 16, 2022
टी-२० क्रिकेट इतिहासातील ५ सर्वात कमी धावसंख्या
सिडनी थंडर – १५ धावा – अॅडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध – (बीबीएल २०२२)
तुर्की – २१ धावा – चेक प्रजासत्ताक विरुद्ध – (टी-२० आंतरराष्ट्रीय २०१९)
लेसोथो – २६ धावा – युगांडा विरुद्ध – (टी-२० आंतरराष्ट्रीय २०२१)
तुर्की – २८ धावा – लक्झेंबर्ग विरुद्ध – (टी-२० आंतरराष्ट्रीय २०१९)
थायलंड – ३० धावा – विरुद्ध मलेशिया – (टी-२० आंतरराष्ट्रीय २०२२)