नवी दिल्ली : नव्या संसद भवनात लोकसभेतील सेंट्रल हॉल इतका मोठा असेल की भविष्यात जरी खासदारांची संख्या वाढली तर सर्व खासदारांची बसण्याची सोय होणार आहे. सरकारकडून प्रस्तावित नवीन संसद भवनाच्या लोकसभेच्या नवीन इमारतीत 900 आसने असतील. तर संयुक्त अधिवेशनादरम्यान 1350 खासदार आरामात बसू शकतील. सरकारने सेंट्रल व्हिस्टाला पुनर्विकसित करण्याच्या योजनेस मंजुरी दिली आहे. यासाठी 2024 ची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
मात्र या नवीन संसद भवन उभारण्याच्या मुद्यावरून काँग्रेसने नेते आणि माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी नवीन संसद भवनच्या इमारतीच्या डिझाईनवरुन टीका केली आहे. तर काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगील यांनीही ट्विट करुन संसदेच्या नवीन इमारतीवरुन मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगील यांचे ट्विट
नवीन इमारतीचं भूमीपूजन करण्याचा निर्णय ह्रदयद्रावक आणि संवेदनाहीन आहे. देश सध्या आर्थिक मंदीतून जात असताना भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात येत आहे. सरकारचे हे पाऊल म्हणजे अंत्यसंस्कार विधीच्या कार्यक्रमात डिजे वाजविण्यासारखे आहे, असे शेरगील यांनी म्हटलं आहे.
Laying foundation stone of #NewParliamentBuilding at a time when farmers are protesting to save their basic thali is equivalent to “playing DJ music inside a funeral ground” #CentralVista
— Jaiveer Shergill (@JaiveerShergill) December 10, 2020
काँग्रेसने नेते आणि माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांचे ट्विट
नवीन संसद भवन उभारणे म्हणजे अंत्यसंस्कार विधीच्या कार्यक्रमात डिजे वाजविण्यासारखे आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने नेते आणि माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी नवीन संसद भवनच्या इमारतीच्या डिझाईनवरुन टीका केली आहे. जुन्या संसद भवनचा आकार मध्य प्रदेशातील चौसठ योगिनी मंदिरासारखा आहे, तर नवीन इमारतीचा आकार अमेरिका सरकारच्या संरक्षण विभागाची इमारत पेंटागनसारखा असल्याचे सांगितले. र
Well, the existing Parliament building built by the Brits bears a remarkable similarity to the Chausath Yogini Temple in Morena in Madhya Pradesh, while the new ‘atmanirbhar’ Parliament building bears an eerie likeness to the Pentagon in Washington DC. pic.twitter.com/Hy2u6fzlms
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 10, 2020
दरम्यान, नवे संसद भवन त्रिकोणी असेल. भविष्यात लोकसभेच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या नवीन इमारतीच्या आत आसनांची संख्या वाढवली जाणार आहे. नव्या लोकसभेत दोन आसनांचे बाक असतील. यामध्ये खासदार आरामात एकटे बसू शकतील. तर संयुक्त अधिवेशन काळात यावर तीन खासदार बसू शकतील. अशा पद्धतीने एकूण खासदारांची आसन व्यवस्था असेल.
तीन टप्प्यात ही योजना पूर्णत्त्वास नेली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत तीन किमीच्या टप्प्यात असलेल्या ‘सेंट्रल व्हिस्टा क्षेत्राला’ 2021 पर्यंत नवे रुप दिले जाणार आहे. तर भविष्यातील आवश्यकतेप्रमाणे संसद भवनाच्या नव्या इमारतीची निर्मिती 2022 पर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यात सर्व केंद्र मंत्रालयांना एकाच ठिकाणी एकत्रित करण्यासाठी प्रस्तावित समग्र केंद्रीय सचिवालयाची निर्मिती 2024 पर्यंत करण्याचे लक्ष्य आहे. नव्या योजनेनुसार नवीन सचिवालयात 10 भवन उभारले जातील. संसद भवनाच्या अगदी जवळ नवी संसद उभारली जाणार आहे. नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे संग्रहालयात रुपांतर केले जाईल.