संरक्षण दलातील समावेशाचा मार्ग मोकळा
पुणे – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील प्रयोगशाळेने विकसित केलेल्या संरक्षणात्मक कार्बाइनची (बंदुकीची) यशस्वी चाचणी करण्यात आली. भारतीय बनावटीच्या या शस्राने विश्वासार्हता आणि अचूकतेचे कठोर कामगिरीविषयक निकष यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. यामुळे या बंदुकीचे संरक्षण दलाच्या सेवेत समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डीआरडीओने विकसित केलेल्या 5.56ु30 मिमी संरक्षणात्मक कार्बाइनची संरक्षण दलाच्या गुणात्मक आवश्यकतांच्या सर्व निकषांसह यशस्वी चाचणी करण्यात आली. उन्हाळ्यातील कडक तापमानात आणि हिवाळ्यातील उच्च उंचीवर वापर करण्यायोग्य अशा चाचण्यांच्या मालिकेतील चाचण्यांचा हा शेवटचा टप्पा होता.
पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापन (एआरडीई) या प्रयोगशाळेने कार्बाइनची रचना केली आहे. याचा गोळीबारीचा वेग 700 राऊंड प्रति मिनिट एवढा आहे. कार्बाइनची प्रभावी कक्षा 100 मीटरपेक्षा अधिक आहे आणि वजन सुमारे 3.0 किलो आहे.
ज्याची उच्च विश्वसनीयता, मागे सरण्याचे कमी प्रमाण, मागे घेण्यायोग्य बट, सुविधायुक्त रचना, एका हाताने गोळीबार करण्याची क्षमता आणि बहुविध पिकाटिनी रेल ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.