हडपसर – भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती तसेच स्थायी समितीचे माजी सदस्य व नगरसेवक मारुतीआबा तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर मध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अनाथांचा नाथ, वृध्दांचा श्रावण बाळ ,गो-रक्षक आणि प्रभागातील नागरिकांसाठी आपला माणूस म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी हडपसर आणि आबा तुपे मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी, तसेच स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आबा तुपे मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.