मुंबई – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुर येथे सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख नेते सध्या नागपुरात आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील नागपूर दौरा करणार असल्याचं समोर आलं आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे अशात राज ठाकरे हे देखील नागपुरात दाखल होत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उद्या राज ठाकरे नागपूर येथे जाऊन विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करणार असल्याचे समजते. सध्या सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन आणि त्यात विरोधकांकडून होणारे आरोप यामुळे राजकीय वातावरण चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे. अशात राज ठाकरे देखील नागपुरात दाखल होणार आहेत.
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात राज ठाकरेंनी नागपूर दौरा केला होता. त्यानंतर आता ते पुन्हा नागपुरात येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण असल्याचे समजते. राज ठाकरे इतर नेत्यांशी काही चर्चा करणार का ? तसेच सध्या अधिवेशनादरम्यान उपस्थित केल्या जाणाऱ्या नवीन मुद्द्यावर राज ठाकरे माध्यमांशी बोलताना काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.