न्यूयॉर्क : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अजूनही तेथे शेकडो अमेरिकन नागरिक अडकून पडले असून त्यांना तेथून देशाबाहेर स्थलांतरित करण्यासाठी मोठेच कष्ट पडत आहेत. केवळ अमेरिकन नागरिकच नव्हे तर अमेरिकेला मदत करणाऱ्या तालिबानी नागरिकांनाही अमेरिकेने तेथून हलवून अमेरिकेला नेण्याचा निर्णय घेतला आहे.
We have already evacuated more than 18,000 people since July & approximately 13,000 people (from Kabul) since our military airlift began on August 14: US President Joe Biden pic.twitter.com/EeVLPpojFx
— ANI (@ANI) August 20, 2021
अमेरिकेच्या पूर्ण माघारीची मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे. या मुदतीपूर्वी सर्व अमेरिकन नागरिकांना तेथून हलवण्याची कामगिरी अमेरिकेला पार पाडायची आहे. काबूल शहरातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र तालिबान्यांचे पहारे आहेत. त्यामुळे ते पार करून विमानतळाकडे जाणे अमेरिकन नागरिकांसाठी जिकिरीचे व धोकादायक ठरत आहे.
यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तालिबान्यांना गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले,’काबुल विमान तळावरून आता पर्यंत ऐकून १३ हजार नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आल आहे. अमेरिकेला हे माहिती नव्हते हे २० वर्षांच्या युद्धानंतर देखील अफगाणिस्थानात किती लोक राहत असे. अमेरिकी लोकांना सुरक्षित बाहेर काढतांना मदतकार्यामध्ये तालिबान्यांकडून अडथळा निर्माण केला जाण्याची शक्यता आहे. जर मदतकार्यामध्ये तसेच अमेरिकी फौजा किंवा काबूल विमानतळावर सुरू असलेलं बचावकार्य यावर कोणत्याही प्रकारचा तालिबान्यांकडून हल्ला करण्यात आला तर, त्याला तितक्यात तीव्रतेनं उत्तर दिलं जाईल”, असं बायडेन यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, काबूल शहरातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र तालिबान्यांचे पहारे आहेत. त्यामुळे ते पार करून विमानतळाकडे जाणे अमेरिकन नागरिकांसाठी जिकिरीचे व धोकादायक ठरत आहे. तसेच अफगाणि समर्थकांनाही तेथून हलवणे अवघड बनत चालले आहे. अनेक अमेरिकन व अफगाणिस्तान नागरिकांकडे त्यांची वैध कागदपत्रे आहेत.
पण ही कागदपत्रे तपासणे किंवा वाचणे तालिबानी गनिमांना शक्य होत नसल्यानेही त्यांची अडचण वाढली आहे. तथापि, अमेरिकन अधिकाऱ्यांनी तेथे केलेल्या उपाययोजनांमुळे गुरुवारी सहा हजार नागरिकांना अमेरिकेबाहेर पडण्याची अनुमती मिळाली आहे. त्यांना उद्यापर्यंत तेथून हलवले जाणार आहे. अजून नेमके किती अमेरिकन नागरिक तेथे अडकून पडले आहेत याची नेमकी आकडेवारी अजून उपलब्ध नाही.
ज्या अफगाणी नागरिकांना अमेरिकेत घेऊन जाण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे त्याचीही आकडेवारी उपलब्ध नाही. काबूल विमानतळ अमेरिकन फौजांच्या ताब्यात असला तर त्या विमानतळाकडे येणारे सर्व रस्ते मात्र तालिबान्यांच्या हातात आहेत. त्यामुळे हे काम पार पाडणे ही एक मोठीच जोखीम आहे.