शिरूर -तालुक्यातील नागरगाव हद्दीत निमोणे- चौफुला रस्त्यावर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत असताना तलाठी दीपक विठ्ठल गांगर्डे यांना मातीमाफिया दादा हंडाळ व त्याच्या हस्तकांनी बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केला. यात तलाठी गांगर्डे यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे हल्लेखोर दादा हडाळ, त्याचे दोन साथीदार व ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद दीपक विठ्ठल गांगर्डे यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिरदेव काबुगडे करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य तलाठी व मंडलाधिकारी संघ शिरूर तालुका यांच्या वतीने या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे.