पुणे – लेह येथे अतिशय प्रतिकूल वातावरणात रस्त्याचे काम सुरू असताना लष्कराच्या 115 इंजिनिअर्सच्या तुकडीतील नायक सचिन मोरे हे दरीत कोसळल्याने शहीद झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी खासगी विमानाने पुण्यात आणण्यात आले.
दक्षिण मुख्यालय आणि हवाई दलातर्फे सचिन मोरे यांना मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनाने त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या मूळगावी नेण्यात आले. येथे त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.