शिक्रापूर -दहिवडी (ता. शिरूर) येथे महिला घरात एकटी असताना गावातीलच एकाने घरामध्ये प्रवेश करून महिलेचा विनयभंग करून दमदाटी केली होती. याचा जाब विचारल्याच्या कारणातून तिघांनी महिलेसह नातेवाइकांना मारहाण केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर विनयभंग व मारहाणीचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग बाळासाहेब उकले, महेश पांडुरंग उकले, विकास पांडुरंग उकले (सर्व रा. उकलेवस्ती, दहिवडी, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.