Team India – बीसीसीआयने ( BCCI ) ने न्यूझीलंड दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची ( Team India ) घोषणा केली आहे. या मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मासह संघातील इतर काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला या संघात स्थान देण्यात आले आहे. तर दुसरीकडे दिनेश कार्तिकला विश्रांती दिली की संघातून डच्चू दिलाय, याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.
“आम्ही हरलो नाही ते जिंकले…”, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाबाबत रोहितची प्रतिक्रिया
न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. टी-२० विश्वचषक खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनलाही या मालिकेसाठी संघात देण्यात आलेले नाही.
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाला ( Team India ) तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात १८ नोव्हेंबरला होणार्या पहिल्या टी-२० सामन्याने होणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना २० नोव्हेंबरला तर तिसरा आणि अंतिम सामना २२ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
टी-२० विश्वचषकानंतर लगेचच टीम इंडिया ( Team India ) न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद आणि ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. हार्दिकने यापूर्वी कर्णधारपद भूषवलेले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याच्या कर्णधार कौशल्याची कसोटी लागणार आहे. न्यूझीलंड संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे भारतीय संघासाठी सोपे नसणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ ( Team India ) टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवनला कर्णधार तर ऋषभ पंतला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे. संघात जवळपास सर्वच युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –
हार्दिक पंड्या ( कर्णधार ), ऋषभ पंत ( उपकर्णधार, यष्टीरक्षक ) , शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन ( यष्टीरक्षक ), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
Squad for NZ T20Is:
Hardik Pandya (C), Rishabh Pant (vc & wk), Shubman Gill, Ishan Kishan, Deepak Hooda, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Sanju Samson (wk), W Sundar, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Arshdeep Singh, Harshal Patel, Mohd. Siraj, Bhuvneshwar Kumar, Umran Malik.
— BCCI (@BCCI) October 31, 2022
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत ( यष्टीरक्षक, उपकर्णधार ), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन ( यष्टीरक्षक ), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
Squad for NZ ODIs:
Shikhar Dhawan (C), Rishabh Pant (vc & wk), Shubman Gill, Deepak Hooda, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Sanju Samson (wk), W Sundar, Shardul Thakur, Shahbaz Ahmed, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Arshdeep Singh, Deepak Chahar, Kuldeep Sen, Umran Malik.
— BCCI (@BCCI) October 31, 2022