डोर्लेवाडी : बारामतीमध्ये आज हत्येचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगवी येथे सकाळी दहाच्या सुमारास एका युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना समोर आली आहे. विनोद हिराचंद फडतरे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो तीस वर्षांचा होता. विनोद हा बारामतीच्या सांगवीतील रहिवासी होता.
विनोद सकाळी जुना सांगवी पणदरे रस्त्यावरील शेतात आपल्या दुचाकी वरुन गेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात व्यक्तीने विनोदच्या डोक्यात दगड घालून त्याची विदारद पद्धतीने हत्या केली. हल्लेखोराने यावेळी विनोदची दुचाकी (एमएच ४२ एक्स ६२९५) देखील पाडली असल्याचे समोर आले.
डोक्यात दगड घातल्याने यावेळी विनोदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण तयार झाले आहे. माळेगाव ठाण्याचे पोलिस खून केलेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.