नवी दिल्ली : देशात करोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कारण देशात मागच्या 24 तासांत 7,830 नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 40,215 वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. याआधीच्या दिवशी करोनाचे 5,676 रुग्ण आढळून आले होते. तर, याआधी देशात करोनाचे 5,880 रुग्णांची नोंद झाली होती.
Covid-19 | India’s active caseload jumps to 40,215 with 7,830 new cases in the last 24 hours pic.twitter.com/vpJHbMKVfF
— ANI (@ANI) April 12, 2023
देशात रविवारी संपलेल्या मागील आठवड्यात करोना रुग्णसंख्येत 79 टक्के वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात 36 हजार रुग्णांची नोंद झाली. तर, महाराष्ट्रात मंगळवारी करोनाचे 919 नवे रुग्ण आढळून आले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला.
यात मुंबईतील 242, नागपुरातील 105, पुणे 58, नवी मुंबईतील 57 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. राज्यातील एकमेव कोविड-19 मृत्यूची नोंद अकोला शहरात झाली आहे.