जळोची- बारामती तालुक्यात गावठी दारू अड्ड्यासह जुगार अड्ड्यावर छापा टाकत तालुका पोलिसांनी ५४ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नीरा नदीच्या किनाऱ्यालगत गावठी हातभट्टीची अड्ड्यावर कारवाई करून येथील, दारू तयार करण्याचे साहित्य व रसायन असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी मनोज जाधव (रा.घाडगेवाडी.ता.बारामती) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वडगाव निंबाळकर येथील मटका अड्ड्यावर छापा घालून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम १२ हजार २० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी सयाजी पवार (रा. हडपसर.जि. पुणे) सह इतर ३ जणांवर विविध कलमान्वये वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या अधिपत्याखाली पोलीस फौजदार संदिप गोसावी, सुरेश भोई, तानाजी गावडे, संदेश ओमासे, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहूल लाळगे, शरद गावडे, जयश्री गवळी, लता हिंगणे यांनी केली.