पुणे, दि. 29 –राज्यात करोनाच्या बीए. 2.75 व्हेरियंटचे रुग्ण वाढले असून, शुक्रवारी 32 रुग्णांची नोंद झाली. बीए. 5 चे चार रुग्ण नव्याने आढळले आहेत. एकूणच बाधितांमध्ये पुणे आणि नागपूर आघाडीवर आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. 5 चे 4 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए.2.75 व्हेरीयंटचे देखील 32 रुग्ण आढळले आहेत. यातील 23 रुग्ण नागपूर येथील, 11 यवतमाळ आणि 2 वाशिम येथील आहेत. या सर्व रुग्णांचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.
जिल्हानिहाय बीए. 4 आणि 5 ची रुग्णसंख्या ः पुणे -101, मुंबई -51, ठाणे – 16, रायगड – 7, सांगली-5, नागपूर -8, पालघर – 4, कोल्हापूर -2.
जिल्हानिहाय बीए. 2.75 ची रुग्णसंख्या ः पुणे -56, नागपूर -33, यवतमाळ -12, मुंबई -5, अकोला – 4, ठाणे -3, वाशिम -2.