मेलबर्न – बेलारुसची स्टार खेळाडू आर्यना सबालेन्काने स्पर्धेतील सनसनाटी निकाल देताना अंतिम फेरी गाठली. तिने अमेरिकेची अव्वल खेळाडू कोको गॉफ हीच्यावर उपांत्य फेरीच्या लढतीत 7-6(2), 6-4 अशी मात केली व थाटात अंतिम फेरी गाठली.
महिलांच्या अन्य लढतीत एकेरीत चीनच्या क्विनवेन झेंगने अॅना कालिन्स्कायाचा पराभव करत प्रथमच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. 12 व्या मानांकित झेंगने ही लढत 6-7, 6-3, 6-1 अशी जिंकली. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनच्या दयाना यास्त्रेमस्काने चेक प्रजासत्ताकच्या लिन्डा नोस्कोवाला 6-3, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
Australian Open 2024 : अल्कराझला पराभवाचा धक्का देत झ्वेरेवची उपांत्य फेरीत धडक…
तसेच, पुरूष गटात सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोवीचला स्पर्धक मानला जात असलेल्या कार्लोस अल्कराझला यंदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. त्याला जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवने पराभवाचा धक्का दिला. ज्वेरेवने अल्कराझचा 6-1, 6-3, 6-7, 6-4 असा पराभव केला.