मेलबर्न :- ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात जॆन्निक सिनरने पहिल्या दोन सेटमधील पिछाडीवरुन पुढील तीनही सेट सहज जिंकत विजेतेपदाकडे वाटचाल. रविवारी झालेल्या या विलक्षण सामन्यात सिन्नरने डॅनिल मेदवेदेवचा ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ असा पराभव करत आपले पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जिंकले.
ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकणारा २२ वर्षीय सिन्नर हा पहिला इटालियन टेनिसपटू ठरला आहे. उपांत्य फेरीत त्याने जगज्जेता खेळाडू नोव्हाक जोकोविचचे स्पर्धेतील प्रदीर्घ वर्चस्व संपवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे या विजेतपदावर त्याने सार्थ आपला हक्क प्रस्थापित केला.
Sublime from Sinner 🥕
The Italian 🇮🇹 clinches his maiden Grand Slam title 🏆
He triumphs in five hardfought sets 3-6 3-6 6-4 6-4 6-3 to win #AO2024. @janniksin • @wwos • @espn • @eurosport • @wowowtennis pic.twitter.com/DTCIqWoUoR
— #AusOpen (@AustralianOpen) January 28, 2024
डॅनिल मेदवेदेवने सुरुवातीच्या सेटमध्ये जॅनिक सिनरचा ६-३ असा पराभव करून अचूक सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवने ५-१ अशी आश्वासक आघाडी प्रस्थापित केली. मात्र, दुसरा सेट ३-६ असा पुन्हा गमावण्यापूर्वी सिन्नरने थोडासा रिकव्हर करून ब्रेक घेतला.
आता तिसरा सेट जिंकून आणखी एक ग्रॅंडस्लॅम विजेतेपद खिशात घालायचे या तयारीने मेदवेदेव कोर्टव्र उतरला. मात्र सिन्नरने मेदवेदेवला तिस-या सेटमध्ये पुरते बांधून ठेवले आणि हा सेट ६-४ असा जिंकला. त्यानंतर त्याने निर्णायक दहाव्या गेममध्ये सर्व्हिस भेदत मेदवेदेववरराअक्रमण सुरुच ठेवले.
मेदवेदेवला चौथ्या सेटमध्येही विजयाची चाहूल सिइनरने लागू दिली नाही. तोच आक्रमकपणा कायम ठेवत आणि कोर्टवर उत्तम कव्हरेज करत सिन्नरने मेदवेदेवला चुका करण्यास भाग पाडले आणि चौथा सेटही ६-४ असा जिंकला. जॅनिक सिनर आणि मेदवेदेव यांच्या २-२ अशी सेटची बरोबरी झाल्यानंतर पाचव्या निर्णायक सेटमध्ये जोरदार झुंज अपेक्षित होती. मात्र या सेटमध्ये मेदवेदेवला प्रभावहीन करत सिन्नरने ६-३ ने हा सेट जिंकून विजेतेपदाला गवसणी घातली. तीन तास 44 मिनिटांच्या खेळानंतर सिन्नरने जल्लोष केला.
Australian Open 2024 : आर्याना सबालेन्काची सलग दुसऱ्यांदा ‘ऑस्ट्रेलियन ओपन’वर मोहोर…
ऑस्ट्रेलियन ओपन एकेरीचे विजेतेपद जिंकणारा जॅनिक सिनर हा पहिला इटालियन टेनिसपटू, पुरुष किंवा महिला ठरला. गेल्या 19 वर्षात मेलबर्नमध्ये विजेतेपद पटकावणारा स्टॅन वॉवरिन्का नंतर बिग-3 च्या बाहेरचा तो दुसरा खेळाडू आहे. डॅनिल मेदवेदेवला पराभूत करण्यापूर्वी, 22 वर्षीय खेळाडूने बोटिक व्हॅन डी झांडशल्प, जेस्पर डी जोंग, सेबॅस्टियन बेझ, कॅरेन खाचानोव्ह, आंद्रे रुबलेव्ह आणि नोव्हाक जोकोविच यांना मागे टाकले.