मेलबर्न – भारताचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णा भारताकडून ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्यासाठी सज्ज बनला आहे. या ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यु एब्डेनसह पुरुष दुहेरीत खेळताना थाटात अंतिम फेरी गाठली आहे. अशी कामगिरी करणारा बोपण्णा भारताचा पहिलाच वरिष्ठ पुरुष टेनिसपटू ठरला आहे. याचबरोबर त्याने जागतिक टेनिसमध्ये क्रमवारीतही अव्वलस्थान प्राप्त केले आहे. त्याने ही कामगिरी वयाच्या 43 व्या वर्षी केली आहे.
The UNSTOPPABLE BOPSY 🥳
Update: #Tennis #AustralianOpen🎾
At 43, Rohan Bopanna is giving us major success goals and we are loving it 🤗
The decorated #TOPSchemeAthlete and his ace partner Matthew Ebden just scored their 2⃣nd consecutive Grand Slam final ticket, crushing it… pic.twitter.com/ufhS1puEZa
— SAI Media (@Media_SAI) January 25, 2024
या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बोपण्णा-एब्डेन जोडीने चीनच्या बिगरमानांकित झांग झिझेन आणि चेक प्रजासत्ताकच्या टॉमस मशाक यांचा 6-3, 3-6, 7-6 असा पराभव केला. या विजयासह बोपण्णा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 43 वर्षीय रोहन बोपण्णा आता पहिले ग्रँड स्लॅम जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
The UNSTOPPABLE BOPSY 🥳
Update: #Tennis #AustralianOpen🎾
At 43, Rohan Bopanna is giving us major success goals and we are loving it 🤗
The decorated #TOPSchemeAthlete and his ace partner Matthew Ebden just scored their 2⃣nd consecutive Grand Slam final ticket, crushing it… pic.twitter.com/ufhS1puEZa
— SAI Media (@Media_SAI) January 25, 2024
बोपण्णा व एब्डेन या जोडीने पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. मात्र, दुसरा सेट सुरु झाल्यावर त्यांच्य खेळात संथपणा आला. त्याचा लाभ घेत झीझेन व मशाक जोडीने दुसरा सेट 3-6 असा जिंकत सामन्यात 1-1 बरोबरी केली. आता तिसरा व निर्णायक सेट सुरु झाल्यावर पुन्हा एकदा बोपण्णा व एब्डेन यांनी आक्रमक खेळ केला. त्यांनी 6-6 अशी बरोबरी झाल्यावरही टायब्रेकरमध्ये हा सेट 7-6 असा जिंकत सामनाही जिंकला व अंतिम फेरीही गाठली.
#U19WorldCup2024 #INDvIRE | भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडचा 201 धावांनी केला पराभव…
बोपण्णाने एब्डेनच्या साथीत यंदाच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले तर हा एक विक्रमच ठरेल. वयाच्या 43 व्या वर्षी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकणारा तो भारताचा पहिलाचा दुहेरीतील टेनिसपटू ठरणार आहे. 2013 व 2023 सालीही बोपण्णाने अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत प्रवेश केला होता. मात्र, या दोन्ही वेळी त्याना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.