Kidnapping News – मराठवाड्यातून आलेल्या दाम्पत्याच्या सात महिन्यांच्या मुलाचे पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण करण्यात आले. अपहरणकर्ता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. श्रावन अजय तेलंग (७ महिने, रा. मराठवाडा) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. (Video: Kidnapping of 7-month-old baby from Pune railway station area, incident caught on CCTV )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दाम्पत्य दोन दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे काही कामानिमित्त आले होते. काम न झाल्याने ते रेल्वे स्थानक परिसरात राहिले होते. शनिवारी काम झाल्यावर ते पुन्हा घरी परतणार होते. मात्र, रात्री दोनच्या सुमारास ते झोपले असताना, एका व्यक्तीने श्रावणला उचलून नेले.
Video : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ७ महिन्यांच्या बाळाचे अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/n2GiVoCSVc
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) April 27, 2024
पहाटे जाग आल्यावर त्यांनी शोधाशोध केली. मात्र, मुलगा सापडला नाही. अखेर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले असता, एक व्यक्ती मुलाला उचलून घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांना मालधक्का परिसरापर्यंतचे फुटेच मिळाले आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी दिली.