नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना (सीबीआय), विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहे. यात विशिष्ट सेवेसाठी 6 अधिकाऱ्यांना पदकं प्रदान केली जाणार आहेत. तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 25 अधिकार्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत. त्यात मुंबईतील 4 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
विशिष्ट सेवेसाठी 6 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक
-अमित कुमार, आयपीएस, सहसंचालक , एसी (मुख्यालय), सीबीआय, नवी दिल्ली (आता छत्तीसगड पोलिसांमध्ये अतिरिक्त महासंचालक)
-विद्या कुलकर्णी, आयपीएस , सहसंचालक (चेन्नई क्षेत्र ), सीबीआय , चेन्नई
-जगरूप एस. गुसिन्हा, डीआयजी, ईओ-I,, सीबीआय, नवी दिल्ली
-मयुख मैत्रा, एएसपी, एसयू, सीबीआय, कोलकाता
-सुभाष चंद्र, एएसआय , एसी -I, सीबीआय , नवी दिल्ली
-श्रीनिवासन इल्लीक्कल बहुलेयन, हेड कॉन्स्टेबल एससीबी , सीबीआय, तिरुवनंतपुरम.
गुणवत्ता सेवेसाठी देण्यात आलेल्या पदकांमध्ये 4 मुंबईतील अधिकाऱ्यांची नावे
-वीरेश प्रभू संगनकल, आयपीएस, डीआयजी, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई
-शारदा पांडुरंग राऊत, आयपीएस, डीआयजी, ईओबी , सीबीआय, मुंबई
-मनोज चालदन, डीएलए, एसीबी, सीबीआय, मुंबई
-अमित विक्रम भारद्वाज, एएसपी, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई