AUS vs NZ 1st Test : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ( #NZvAUS ) यांच्यातील पहिली कसोटी रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या 3 बाद 111 धावा आहे. सध्या न्यूझीलंडला विजयासाठी 258 धावांची गरज आहे, तर किवी संघाचे 7 फलंदाज शिल्लक आहेत.
एकवेळ ऑस्ट्रेलिया कसोटीत खूप पुढे दिसत होता, पण दुसऱ्या डावात किवी गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी सादर केली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात अवघ्या 164 धावांवर गुंडाळले. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 204 धावांची भक्कम आघाडी मिळाली होती.
A 52-run partnership between Rachin Ravindra (56*) and Daryl Mitchell (12*) takes us to stumps on Day 3 in Wellington 🏏 Head to https://t.co/3YsfR1YBHU or the NZC App for the full scorecard 📲 #NZvAUS pic.twitter.com/zUqKyFFbm0
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 2, 2024
ग्लेन फिलिप्सने वाढवल्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणी…
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने भेदक गोलंदाजी केली. ग्लेन फिलिप्सने 16 षटकात 45 धावा देत 5 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपले बळी बनवले. याआधी ग्लेन फिलिप्सने फलंदाजीत आपली ताकद दाखवली होती. ऑस्ट्रेलियाच्या 383 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ 179 धावांवर आटोपला. पण यामध्ये ग्लेन फिलिप्सने उत्कृष्ट फलंदाजी करताना महत्वपूर्ण खेळी केली होती. ग्लेन फिलिप्सने पहिल्या डावात 70 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली. या फलंदाजाने आपल्या झंझावाती खेळीत 13 चौकार मारले होते.
पहिला कसोटी सामना रोमांचक टप्प्यावर…
न्यूझीलंडसमोर विजयासाठी 369 धावांचे लक्ष्य आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किवी संघाने 3 बाद 111 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. अशा प्रकारे न्यूझीलंडला विजयासाठी अजूनही 258 धावा कराव्या लागणार आहेत. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल क्रीजवर आहेत. रचिन रवींद्र 94 चेंडूत नाबाद 56 धावा करून तर डॅरिल मिशेल नाबाद 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
BCCI & IPL : ‘या’ खेळाडूंना आयपीएलपेक्षा ‘बीसीसीआय’कडून मिळणार जास्त पैसे…! जाणून घ्या, कसं काय…
तर याआधी टॉम लॅथम (8 धावा), विल यंग (15 धावा) आणि केन विल्यमसन (09 धावा) हे बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये गेले आहेत. दुसऱ्या डावातील गोलंदाजीत आत्तापर्यंत नॅथन लायन हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. नॅथन लायनने 2 गडी बाद केले आहेत तर ट्रॅव्हिस हेडच्या नावावर 1 विकेट आहे.