BCCI Central Contract & Salary : बीसीसीआयने खेळाडूंचा नवा केंद्रीय करार जारी केला आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये एकूण 40 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. करारातील खेळाडूना ग्रेड(श्रेणी) नुसार मानधन दिले जाते. याध्ये प्लस ए श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी तर ए श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये मिळतात. बी श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 3 कोटी रुपये मिळतात. याशिवाय सी श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक एक कोटी रुपये दिले जातात. दरम्यान, या करारामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलपेक्षा बीसीसीआयच्या करारातून जास्त पैसे मिळणार आहेत. अशा काही खेळाडूंबदल आपण जाणून घेऊयात…
Kuldeep yadav : बीसीसीआयच्या करारात कुलदीप यादव ग्रेड-बी मध्ये आहे. त्याला वार्षिक 3 कोटी रुपये मिळतील तर दिल्ली कॅपिटल्सने त्याला 2 कोटी रुपयांना खेरदी केले आहे.
Rinku singh : रिंकू सिंगला बीसीसीआयने ग्रेड-सी मध्ये ठेवले असून त्याला एक कोटी रुपये मिळणार आहेत. त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघात 55 लाख रुपये मिळतात.
Rajat Patidar : रजत पाटीदारला बीसीसीआयने ग्रेड-सी मध्ये ठेवले आहे. त्याला बोर्डाकडून एक कोटी रुपये पगारही मिळणार आहे. त्याला आयपीएलमध्ये आरसीबीकडून 20 लाख रुपये मिळतात.
Jitesh Sharma : जितेश शर्माला पंजाब किंग्सने अवघ्या 20 लाखांमध्ये खरेदी केले. BCCI च्या ग्रेड C मध्ये आल्याने त्याला आता वार्षिक 1 कोटी रुपये मिळतील.
Ks bharat : केएस भरतला C ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले असून त्याला वार्षिक 1 कोटी रुपये मिळतील. आयपीएलसाठी केकेआरने त्याला 50 लाख रुपयांना लिलावात खरेदी केले आहे.
Dhruv Jurel : धरमशाला कसोटीत मैदानात उतरताच ध्रुव जुरेलचा ‘सी’ ग्रेडमध्ये समावेश केला जाईल. त्याला बीसीसीआयकडून एक कोटी रुपये पगार मिळणार आहे. तर आयपीएलमध्ये त्याला राजस्थान रॉयल्समध्ये 20 लाख रुपये मिळतात.