World Cup 2023 NZ vs AUS Live Score : विश्वचषकाच्या 27 व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. दोन्ही संघांकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज आहेत आणि अशा परिस्थितीत एक रोमांचक सामना होऊ शकतो. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 49.2 षटकात 388 धावांवर संपला.
NZ vs AUS Live Score : विजयासाठी 389 धावांचा पाठलाग करताना सध्या न्यूझीलंड संघाच्या 20.2 षटकात 2 बाद 143 धावा झालेल्या आहेत. त्यांना विजयासाठी 32 षटकात 264 धावांची आवश्यकता आहे. सध्या मिशेल आणि रचिन यांन डावाची धुरा सांभाळली आहे. रचिन 24*(31) आणि मिशेल 46*(37) धावांवर खेळत आहेत. दोघेही चांगली भागीदारी करत न्यूझीलंडला लक्ष्याच्या जवळ घेऊन जात आहेत.
न्यूझीलंड संघानं दुसरी विकेट गमावली…
न्यूझीलंडने 72 धावांत दोन विकेट गमावल्या आहेत. डेव्हॉन कॉनवेनंतर विल यंगही माघारी परतला आहे. त्याने 37 चेंडूत 32 धावा केल्या. जोश हेझलवूडने त्याला मिचेल स्टार्ककरवी झेलबाद केले. न्यूझीलंडला पहिला धक्का आठव्या षटकात 61 धावांवर बसला. जोश हेझलवूडने डेव्हन कॉनवेला मिचेल स्टार्ककरवी झेलबाद केले. त्याला 17 चेंडूत 28 धावा करता आल्या.
Super catch from Starc at short fine leg and Conway’s gone! #CWC23
— cricket.com.au (@cricketcomau) October 28, 2023
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 49.2 षटकात 388 धावांवर संपला. एकदिवसीय आणि एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाने कॅनबेरा येथे किवीजविरुद्ध पाच गडी गमावून 378 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची विश्वचषकातील ही तिसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. ट्रॅव्हिस हेडने विश्वचषकातील पहिला सामना खेळताना अवघ्या 59 चेंडूत शतक झळकावले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे चौथे शतक होते. ट्रॅव्हिस हेडला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही. त्याने वॉर्नरसोबत पहिल्या विकेटसाठी 117 चेंडूत 175 धावांची भागीदारी केली होती. 59 चेंडूतील शतक हे या विश्वचषकातील तिसरे जलद शतक आहे. ग्लेन मॅक्सवेलने 40 चेंडूत शतक तर एडन मार्करामने 49 चेंडूत शतक झळकावले. हेडने 67 चेंडूत 10 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली.
त्याच वेळी, वॉर्नरने सलग तिसऱ्या सामन्यात 50+ धावा केल्या. यापूर्वी त्याने पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध शतके झळकावली होती. वॉर्नर 65 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 81 धावा करून बाद झाला. यानंतर स्टीव्ह स्मिथही 18 धावा करून माघारी परतला . ग्लेन फिलिप्सने तिन्ही विकेट घेतल्या. मिचेल मार्श 36 धावा करून बाद झाला तर मार्नस लॅबुशेन 18 धावा करून बाद झाला.
त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 41 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी जोश इंग्लिशने 28 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 38 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने 14 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. 49 व्या षटकात ट्रेंट बोल्टने एकाच षटकात तीन बळी घेतले. इंग्लिश आणि कमिन्सशिवाय त्याने झाम्पाला बाद केले. त्यानंतर 50 व्या षटकात मॅट हेन्रीने मिचेल स्टार्कला नीशमकडे झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 388 धावांवर संपवला. बोल्ट आणि फिलिप्सने प्रत्येकी तीन, मिचेल सँटनरने दोन विकेट घेतल्या. हेन्री आणि नीशम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.