Israel – Hamas war: इस्रायल-हमास (Hamas) युद्धाचे (Israel – Hamas war)पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पडताना दिसून येत आहेत. कारण या युद्धा दरम्यान चीनमधील बीजिंगमध्ये इस्रायलच्या एका राजदूतावर चाकूने हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
इस्रायलच्या (Israel) परराष्ट्र मंत्रालयाने दूतावासावर हल्ला झाला नसल्याची पुष्टी केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हल्लेखोराबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राजनयिकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, इस्रायलच्या (Israel) परराष्ट्र मंत्रालयाने मध्यपूर्वेतील चिनी राजदूताशी फोन कॉलमध्ये हमासच्या (Hamas)आठवड्याच्या शेवटी झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात चीनच्या अपयशाबद्दल तीव्र निराशा आणि चिंता व्यक्त केली आहे.