सुप्रसिद्ध अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन झाले आहे. 67 वर्षीय भैरवी वैद्य यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या को-स्टार सुरभी दास यांनी दुजोरा दिला आहे. या दोघीनी ‘निमा डेन्झोंगपा’ या मालिकेत एकत्र काम केले होते.
भैरवी वैद्य यांच्या निधनाबद्दल सुरभी यांनी शोक व्यक्त केला. ‘निमा डेन्झोंगपा’ या मालिकेच्या सेटवर सुरभी यांनी भैरवीसोबत खूप छान वेळ घालवला. अभिनेत्रीच्या मृत्यूने शोच्या स्टारकास्टला धक्का बसला आहे. भैरवीची आठवण करून सगळेच भावूक होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भैरवी बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. अनेक महिन्यांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत असल्याची चर्चा आहे.
भैरवी या गेल्या ४५ वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या.त्या अनेक गुजराती, हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसल्या. चाहत्यांनी त्यांना शेवटचे ‘निमा डेन्झोंगपा’ या मालिकेत पाहिले होते. हसरतेन आणि महिसागर सारख्या शोमध्ये भैरवी यांचे काम खूप आवडले होते.
या दिग्गज अभिनेत्री भैरवी यांनी ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना स्टारर ‘ताल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने जानकीची भूमिका केली होती. त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. भैरवीने सलमान खानच्या चोरी ‘चोरी चुपके चुपके’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्या एक प्रसिद्ध नाट्यकलाकार होत्या. भैरवी या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्यांनी बहुतेक प्रोजेक्ट्समध्ये आईची भूमिका साकारली होती. दरम्यान, चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.