Supreme Court on Rahul Narvekar : आज न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून खडेबोल सुनावले आहे. यावरून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील. त्यांना देखील विविध प्रकारचे कागदपत्र तपासावे लागत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत आहे. मात्र, न्यायालयाच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष हे आता लवकरच शेड्युल देतील, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. निवडणुक आयोगाने यापूर्वी खरी शिवसेना आम्ही आहोत, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही देखील आता अध्यक्षांकडून निर्णयाची वाट बघत आहोत.’ असेही ते म्हणाले आहे.
तत्पूर्वी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येझालेल्या बंडानंतर आता त्यांच्यातील फुटीच्या प्रकरणाची सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)चार महिन्यांपूर्वी विधानसभा अध्यक्षांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्यामुळे महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांना सुनावत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून (Rahul Narvekar) योग्य ती पावलं उचलण्यात न आल्यामुळे आज न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून खडेबोल सुनावले आहे.