Elon Musk China Visit| जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलॉन मस्क भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांचा दौरा लांबणीवर पडला आहे. यातच आता एलॉन मस्क यांनी भारताऐवजी अचानक चीनचा दौरा केला. यावेळी त्यांनी चिनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. रविवारी अचानक चीनच्या दौऱ्यावर गेलेले मस्क यांनी चीनमध्ये टेस्लाबाबत काही महत्त्वाची नवी योजना तयार करण्याबाबत चर्चा केली.
चीनच्या पंतप्रधानांसोबतचा मस्क यांनी शेअर केला फोटो
चीन दौऱ्यामध्ये ते फूल सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरच्या रोलआऊट आणि डेटा ट्रान्सफरबाबत चर्चा करणार आहेत. डेटा ट्रान्सफरच्या माध्यमातून ते टेस्लाच्या एफएसडी अल्गोरिदमला प्रशिक्षण देतील तसेच ते अधिक चांगले बनवण्यासाठी काम करतील. बीजिंगमध्ये भेटीदरम्यान पंतप्रधान ली कियांग यांनी मस्क यांना सांगितले की, चीनमधील टेल्साचा विकास हे अमेरिका-चीन आर्थिक आणि व्यापारी सहकार्याचे यशस्वी उदाहरण मानले जाऊ शकते.
दरम्यान, मस्क यांनी चिनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर एक्स प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चीनच्या पंतप्रधानांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. Elon Musk China Visit|
दरम्यान, यूएस इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने चार वर्षांपूर्वी त्यांच्या ऑटो-पायलट सॉफ्टवेअरची स्वायत्त आवृत्ती फुल सेल्फ ड्रायव्हिंग (एफएसडी) लाँच केली, परंतु अनेक ग्राहकांच्या विनंतीनंतरही चीनमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात अद्याप सक्षम झालेले नाही. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आहे. Elon Musk China Visit|
मस्क यांनी आपला भारत दौरा पुढे ढकलला
एलॉन मस्क भारत दौऱ्यावर येणार होते, त्यासाठी 22 तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, नंतर मस्कने आपला भारत दौरा पुढे ढकलला आणि त्यानंतर आठवडाभरातच त्यांनी अचानक भारताचा शेजारी देश चीनला भेट देत आश्चर्याचा धक्का दिला.
हेही वाचा: