मनसेचे इंजिन येत्या विधानसभेत धडाडणार, ज्योतिषांचं भाकीत

नाशिक – लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र दोन अंकी जागा मिळतील, असे भाकीत महाराष्ट्र राज्य ज्योतीष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मराटकर यांनी ज्योतीष परिषदेत वर्तविले आहे. मराटकर यांच्या या भाकीतामुळे मनसे वर्तुळात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्र ज्योतीष परिषदेचे कालपासून नाशिक येथे संमेलन सुरू आहे. या समेलंनात विविध मुद्यावर विचारमंथन सुरू आहे. यावेळी संमेलनात बोलतांना ज्योतीष परिषदेचे अध्यक्ष ज्योतीष महर्षी सिद्धेश्वर मराटकर यांनी मनसेच्या पुढील वाटचाली विषयी वरील भाकीत वर्तविले.

साल 2014 ते 2019 हा काळात मनसे अथवा राज ठाकरेंना विशेष यश मिळालं नाही. मागील दोन महिन्यातील राज ठाकरेंच्या प्रचाराचा झंझावत बघता त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणात दिसेल. यांचा भाजप शिवसेनेला फटका बसणार असल्याचं देखील त्यांनी सांगितल आहे.

याबरोबरच लोकसभा 2019 लोकसभा बदल ही त्यांनी भाकीत केलं असून मोदी हेच पंतप्रधान बनतील, मात्र बहूमतात नाही असेही मराटकर यांनी स्पष्ट केले आहे. छोटे पक्ष आणि घटक पक्षांना सोबत घेऊन मोदी पुन्हा सत्ता स्थापन करणार असं त्यांनी सांगितल आहे.

दरम्यान, 2019 ची विधानसभा निवडणूक मनसेसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं भाकीत वर्तविण्यात ज्योतिष परिषदेत वर्तविण्यात आलं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेचा प्रभाव कितपत पडेल याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.