नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाने उत्तराखंड विधानसभेसाठी आपल्या 53 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या राज्यात विधानसभेच्या 60 जागा असून बाकीचे सात उमेदवार आज-उद्या जाहीर केले जाणार आहे. कॉंग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काल रात्री पावणे बारा वाजता ही यादी घोषित केली.
मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जाणारे हरिष रावत आणि भाजप सोडून कॉंग्रेस मध्ये दाखल झालेले हरकसिंह रावत या दोघांचीही नावे या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजप सोडून कॉंग्रेस मध्ये दाखल झालेले माजी मंत्री यशपाल आर्य यांना बाजपुर मधून तर त्यांचे पुत्र संजीव आर्य यांना नैनिताल मधून कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे.