नवी दिल्ली – करोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर अजून जारी असून गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 33 हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर देशभरात करोनामुळे 525 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रातच आढळून आले आहेत.या राज्यातील गेल्या 24 तासांतील एकूण रूग्णांची संख्या 46 हजार 393 इतकी आहे. त्या खालोखाल केरळचा नंबर असून तेथे गेल्या 24 तासांत 45 हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत.
कर्नाटकात 42 हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत करोना मृतांचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासांत तिथे 45 रूग्ण दगावले आहेत. नव्याने करोनाची बाधा झालेल्या बहुतांश रूग्णांना बाह्य स्वरूपात या रोगाची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने त्यांच्यावर रूग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाही. अनेकांवर घरच्याघरीच उपचार केले जात आहेत. आणि त्यात ते रूग्ण बरेही होताना दिसत आहेत.