वॉशिंग्टन – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा मानला जातो याच पार्श्वभूमीवर टेक्सासमध्ये आता एका 36 वर्ष युवकाला अधिकाऱ्यांवर थुंकल्याबद्दल तब्बल सत्तर वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. टेक्सास मधील लबाक शहरातील ही घटना असून या 36 वर्षे युवकाचे नाव लॅरी पियरसन असे आहे. लॅरी ज्याठिकाणी रहात होता त्याच्या शेजाऱ्यांनी त्याच्या घरामधून कौटुंबिक हिंसाचाराचे आवाज येत असल्याबद्दल तक्रार केली होती.
त्यानंतर टेक्सासचे पोलीस कारवाई करण्यासाठी गेले असता लॅरीने आपल्या पत्नीला मारहाण केल्याचे लक्षात आले. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याखाली पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला अटक करण्याची कारवाई सुरू केली पण लॅरीने या कारवाईला विरोध केला आणि त्याला अटक करण्यासाठी जवळ येणाऱ्या अधिकाऱ्यांवर तो थुंकला हे अधिकारी आपल्याजवळ येऊ नयेत म्हणून त्याने सतत ही थुंकण्याची प्रक्रिया सुरू ठेवली पण शेवटी अधिकाऱ्यांनी त्याला अटक केले.
लॅरीला न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले तेव्हा न्यायाधीशांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पत्नीला मारहाण केल्याबद्दल त्याला योग्य ती शिक्षा दिली. जाईलच पण सरकारी अधिकाऱ्यांच्या विशेषता पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याबद्दल आणि घृणास्पद वर्तन केल्याबद्दल त्याला तब्बल सत्तर वर्षाची कारावासाची शिक्षा ठेवण्यात आली. याचा अर्थ छत्तीस वर्षे वयाच्या लॅरीला आता आपले संपूर्ण आयुष्य कारावासातच काढावे लागणार आहे.
त्याने या शिक्षेला वरिष्ठ न्यायालयात जर आव्हान दिले नाही किंवा इतर कोणत्या काही कारणाने त्याची शिक्षा जर कमी झाली नाही तर त्याचे संपूर्ण आयुष्य आता करावासातच जाणार आहे सामान्य सांस्कृतिक जीवन जगत असताना कशा प्रकारची वर्तणूक ठेवायला हवी आणि कशा प्रकारची वर्तणूक योग्य नाही हे दाखवून देण्यासाठीच आम्ही एवढी कठोर शिक्षा लॅरीला दिली आहे असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.