खडकवासला – मुंबई-बंगळुरू महामार्गावर खोबरेल तेल घेऊन निघालेल्या टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्यामध्ये असलेल्या दुभाजकाला धडकून टँकर उलटला आहे.
यामध्ये टँकर मधील २४ हजार लिटर खोबरेल तेल रस्त्यावर सांडले आहे. त्यामूळे वाहतूक मंदावली असून घटनास्थळी वाहतूक पोलीस तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहचले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्यावतीने नवले पूल परिसरात घडणाऱ्या वारंवार अपघाताच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये या परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी रंबलर्स बसविण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील अपघाताच्या घटना वारंवार घडतच असल्याचे चित्र आहे.