पिंपरी – भारतीय जनता पक्ष देशात धार्मिक आणि जातीय राजकारण करत असल्याने आर्थिक विषमता वाढत आहे. त्यामुळे धार्मिक आणि आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची महागाई, स्वातंत्र्यानंतर उच्चांकी पहिल्यांदाच वाढलेली बेरोजगारी हे देशासमोर भीषण प्रश्न असताना भाजप मात्र धर्माच्या आणि मंदिराच्या नावाने राजकारण करत आहे, त्यामुळे परिवर्तन घडणे ही काळाची गरज बनली आहे. परिवर्तनाची सुरुवात चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक व पुरोगामी चळवळीतील तब्बल 40 संघटनांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पुरोगामी पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाना काटे यांना पाठींबा जाहीर केला. त्याप्रसंगी रहाटणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मानव कांबळे बोलत होते. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेस महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे यांच्यासह पाठींबा दिलेल्या 40 संघटनांचे प्रमुख तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना मानव कांबळे म्हणाले, न्यायव्यवस्था, रिझर्व्ह बॅंक, निवडणूक आयोग, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा उपयोग विरोधी सरकार पाडण्यासाठी केला जात आहे. सर्व प्रकारचे दबाव तंत्र वापरून जर सरकारच्या विरोधात बोलणारे गप्पा बसत नसतील तर कायद्याचा वापर करून जेलमध्ये टाकले जात आहे. एकूणच या केंद्र सरकारकडून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. आठ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंविधानिक मार्गाने व अनैतिक पद्धतीने सरकार स्थापन केले. भारतीय जनता पक्षाचे व शिंदे गटाचे नेते महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करतात. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी वारंवार महापुरुषांचा अवमान केला त्यांना पाठीशी घालण्याचे काम शिंदे आणि फडणवीस सरकार करत आहे. यावेळी बोलताना धनाजी येळेकर म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ता काळात भाजपने खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे पुराव्यानिशी समोर आले. शहरातील पाण्याच्या प्रश्नांपासून इतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी ठरल्याने आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा दिला आहे. पाठिंबा दिल्याबद्दल उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सर्वांचे आभार मानले.
पाठिंबा दिलेल्या संघटना
बाबा आढाव- हमाल पंचायत, मानव कांबळे- नागरी हक्क सुरक्षा समिती, काशिनाथ नखाते- कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, डॉ. सुरेश बेरी- कामगार संघटना, धनाजी येळकर पाटील – छावा संघटना, सतीश काळे – संभाजी ब्रिगेड, सचिन आल्हाट- छावा संघटना, गणेश दराडे- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अमीन शेख – ऊधऋख पिं.चिं. सचिव, अपर्णा दराडे- जनवादी संघटना, प्रकाश जाधव – मराठा सेवासंघ उद्योग आघाडी, युवराज बाळासाहेब पवार- पिंपरी चिंचवड कामगार संघटना, अशोक मिरगे, आत्माराम नाणेकर – रिक्षा पंचायत पुणे पिंपरी चिंचवड, माधव रोहम- ग्रीव्हज कॉटन युनियन, प्रल्हाद कांबळे- हॉकर्स महासंघ, अरविंद जक्का- आयटक संघटना, शैलेश गोडे – पथारी व्यवसाय पंचायत, लता भिसे- महिला संघटना आयटक, शिवशंकर उबाळे- भीमशाही युवा संघटना, निवृत्ती आरु – संस्थापक सदस्य, कार्याध्यक्ष महारष्ट्र प्रदेश, पॅंथर्स रिपब्लिकन पार्टी, विशाल कसबे- मातंग एकता आंदोलन संघटना, सचिन भाऊ सकाटे- दलित महासंघ, हरिभाऊ वाघमारे- झोपडपट्टी सुरक्षा दल, अभिजीत भालेराव- स्वाभिमानी विकास मंच संघटना, चेतन वाघमारे- सावता परिषद संघटना, शांताराम खुडे- भ्रष्टाचार निर्मूलन समिती, सचिन बगाडे- सत्यशोधक बहुजन आघाडी, गिरीश साबळे- महामानव एक्स्प्रेस रिक्षा संघटना, बाबासाहेब चव्हाण- एकता रिक्षा महासंघ,
प्रदीप पवार- स्वराज अभियान महाराष्ट्र, राजेश माने- बांधकाम कामगार संघ, आशिष शिंदे-कामगार नेते, लालासाहेब गायकवाड- अखिल भारतीय निर्मूलन समिती, दिलीप काकड- नागरी हक्क सुरक्षा समिती, डॉ. कॉ. बी. टी. देशमुख- उझखच्, सिद्धेश्वर कोटुळे, तानाजी हराळे- बाबा आढाव संघटना, चंद्रकांत खंडू क्षीरसागर – बाबा आढाव संघटना, नकुल आनंदा भोईर- वीरभागात सिंग विद्यार्थी परिषद, संतोष वाघे – छावा मराठा संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.