मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. शुक्रवारी निवडणूक आयोगाने आता एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय दिल्यानंतर स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. दरम्यान,मिळाल्यानंतर कंगनाने ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
कंगना राणावतने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे,”वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही”,असे म्हटले आहे.
कुकर्म करने से तो देवताओं के राजा इन्द्र भी स्वर्ग से गिर जाया करते हैं, वो तो सिर्फ़ एक नेता है, जब उसने अन्याय पूर्व मेरा घर तोड़ा था, मैं समझ गई थी, ये शीघ्र ही गिरेगा, देवता अच्छे कर्मों से उठ सकते हैं लेकिन स्त्री का अपमान करने वाले नीच मनुष्य नहीं… ये अब कभी उठ नहीं पाएगा।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 17, 2023
दरम्यान, मागील वर्षी उद्धव ठाकरेंचे सरकार असताना कंगनाच्या घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पाडला होता. त्यावेळीदेखील कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, “आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते…लक्षात असूद्या”.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अभिनेता आरोह वेलणकरने ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे.
Congratulations @mieknathshinde !! बाळासाहेब पण खूष असतील आज…
— Aroh Welankar (@ArohWelankar) February 17, 2023
त्याने लिहिलं आहे, “अभिनंदन एकनाथ शिंदे… बाळासाहेब पण खूश असतील आज”. आरोहच्या या ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.