नवी दिल्ली – ज्येष्ठ नेते व खासदार कपिल सिब्बल यांनी सरकारी अन्यायाच्या विरोधात जी इन्साफ नावाची संघटना काढली आहे त्याला आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीहीं पाठिंबा दिला आहे.
केजरीवालांनी ट्विटरवर हा पाठिंबा जाहींर करताना म्हटले आहे की, सिब्बल साहेबांनी अगदी महत्वाच्या बाबीत पुढाकार घेतला आहे. या अन्याय वागणुकीच्या विरोधात सर्वांनीच एकजुटीने लढण्याची गरज असून त्यासाठी सर्वांनीच त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या या नव्या व्यासपीठाला पाठिंबा मिळवण्यासाठी सिब्बल यांनी जंतरमंतरवर एका मेळाव्याचे आयोंजन केले आहे. त्यात ते आपल्या संघटनेचा उद्देश आणि कार्याची माहिती देणार आहेत. सिब्बल हे राज्यसभेचे अपक्ष खासदार आहेत त्यांना उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे समर्थन आहे.