नासाऊ (बहामास) :- येथे सुरु असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स रिलेमध्ये आपापल्या दुसऱ्या फेरीतील हीटमध्ये दुसरे स्थान मिळवून भारतीय पुरुष आणि महिलांचे ४x४०० मीटर रिले संघ सोमवारी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे भारताच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या पदकांच्या आशा वाढल्या आहेत.
भारतीय महिलांचा ४x४०० मीटर रिले संघ टोकियो गेम्स हुकल्यानंतर आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. भारतीय महिलांच्या पॅरिस संघासाठी पॅरिसमधील सहभाग आठव्यांदाचा असेल. या क्रीडाप्रकारात भारतीय महिलांनी १९८४ मध्ये ऑलिम्पिक पदार्पण केले होते. पुरुषांच्या ४x४०० साठी, भारताने ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची ही चौथी वेळ असेल. सिडनी गेम्समध्ये ऑलिम्पिकमध्ये वर्ष २००० मध्ये भारतीय पुरुषांनी या क्रीडाप्रकारात पदार्पण केले होते.
महिलांच्या स्पर्धेत, रुपल चौधरी, एम आर पूवम्मा, ज्योतिका श्री दांडी आणि सुभा वेंकटेशन या चौघांनी ३ मिनिटे आणि २९.३५ सेकंदांची वेळ नोंदवली. हीट क्रमांक एकवर जमैकाने ३:२८.५४ वेळ नोंदवत त्यांनीही ऑलिम्पिक गेम्सचे तिकीट बुक केले. नंतर, मुहम्मद अनस याहिया, मुहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांच्या पुरुष संघाने ३ मिनिटे आणि३.२३ सेकंदांच्या सामूहिक वेळेसह पूर्ण केले. तर अमेरिकेने २:५९:९५ अशी वेळ नोंदवत पहिले स्थान प्राप्त केले आणि त्यांनीही ऑलिम्पिक गेम्सचे तिकीट बुक केले.
दुसऱ्या फेरीतील प्रत्येकी तीन हीटमधील अव्वल दोन संघ २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार होते.
महिलांचा ४x४०० संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला हे आश्चर्यकारक होते. कारण पुरुषांच्या ४x४०० संघावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले होते. या संघाने जपानमधील टोकियो ऑलिम्पिक आणि २०२३ जागतिक स्पर्धांमध्ये आशियाई विक्रम मोडीत काढला आहे. तसेच २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
Madrid Open 2024 : स्विटेकने पटकावले माद्रिद ओपनचे विजेतेपद….
भारतीय महिला संघ रविवारी पहिल्या फेरीच्या पात्रता फेरीत ३ मिनिटे २९.७४ सेकंद वेळेसह पाचव्या स्थानावर होता. दुस-या लेगचा धावपटू राजेश रमेशच्या पायात क्रॅम्प्स आल्याने मध्यभागीच बाहेर पडल्यानंतर पुरुष संघ पहिल्या फेरीच्या पात्रता फेरीत पोहोचू शकला नाही. अरोकिया राजीवने संघात रमेशची जागा घेतली आणि अनस आणि अजमलनंतर तो तिसरी लेग धावला. अँकर-लेग धावपटू जेकबने अरोकियाकडून बॅटन घेतला तेव्हा भारतीय पुरुषांचा ४x४०० मीटर संघ तिसऱ्या स्थानावर होता, परंतु दिल्लीच्या मुलाने त्याच्या मेक्सिकन प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्यासाठी अप्रतिम शर्यत केली आणि दुसरे स्थान पटकावले.
पॅरिसमध्ये १९ ट्रॅक आणि फील्ड एथलीट
महिला आणि पुरुषांच्या ४x४०० मीटर रिले संघाच्या पात्रतेनंतर भारताकडे आता पॅरिसला जाणारे किमान १९ ट्रॅक आणि फील्ड एथलीट आहेत आणि या यादीत गतविजेता भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्रा यांचा समावेश आहे. जागतिक ऍथलेटिक्स रिले बहामास येथे दोन दिवसांच्या थरारक स्पर्धेनंतर एकूण ७० संघ पॅरिस ऑलिम्पिकमधील रिले स्पर्धांसाठी पात्र ठरले आहेत.