वेहरगाव, देवले, डोंगरगाव येथे धडक कारवाई
कार्ला – लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेहरगाव, डोंगरगाव, देवले येथे गावठी दारू भट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात 2 हजार 100 लिटर दारू नष्ट केली.
देशात लॉकडाऊन सुरू असून, लोणावळा ग्रामीण हद्दीतील वेहरगाव, डोंगरगाव, देवले येथे चोरून गावठी मिळते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रनवरे यांच्या पथकाने धाड टाकली. यामध्ये भट्या उद्ध्वस्त करत दारू बनावणाऱ्यावर पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.