12 विधानसभा मतदारसंघातून 137 जणांनी नेले 202 नामनिर्देशनपत्रे : पहिल्या दिवशी शेवगाव मतदारसंघातून एक अर्ज दाखल
नगर – विधानसभा निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवशी विविध मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नेली. केवळ शेवगाव मतदारसंघात पहिल्याच दिवशी विजय बाबूराव आव्हाड यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले. उर्वरित विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी कोणीही अर्ज दाखल केला नाही.
अर्ज नेलेल्यांमधये शिर्डीतून मंत्री राधाकृष्ण विखे, संगमनेरमधून आमदार बाळासाहेब थोरात, नेवासामधून आमदार बाळासाहेब मुरकुटे,शंकरराव गडाख व सुनिताताई गडाख दाम्पत्य, कोपरगावमधून नगराध्यक्ष विजय वहाडणे,राहुरीतून देवाळलीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, नगर शहरातून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, श्रीरामपूरमधून निवृत्त शिक्षणाधिकारी रामचंद्र जाधव, पारनेरमधून प्रशांत गायकवाड यांचा समावेश आहे.
216-अकोले हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ असून पहिल्या दिवशी 3 जणांनी अर्ज नेले. घाणे मिरा राम (1) संतोष देशमुख (1) पथवे दिपक यशवंत (1), 217-संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकूण 11 जणांनी 20 नामनिर्देशनपत्रे नेली. अविनाश बाळासाहेब सहाणे (1), अजित बाबुराव मोकळ (1), सुर्यभान बाबुराव गोरे (2),कलीराम बहीम पोपटहार (2), अक्षय शरद थोरात (1), बापू पाराजी रणवीर (2), बाळासाहेब निवृत्ती थोरात (1), एकनाथ नारायण थोरात (1) अविनाश हौसिंग भोर(1), विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (4), लक्ष्मण कृष्णाजी पवार (4), 218-शिर्डी मतदारसंघात 6 जणांनी 8 अर्ज नेले.त्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांचा समावेश आहे. 219-कोपरगाव मतदारसंघात 12 उमेदवारांनी 19 अर्ज नेले. यात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासाठी अर्ज नेण्यात आला.
220-श्रीरामपूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातही 17 जणांनी 27 नामनिर्देशनपत्रे नेली. सुनिल दशरथ मोहिते (1), योगेश रविंद्र जाधव (1) राजेंद्र प्रसाद भिमराव दळवी (1) शुभांगी राजेंद्र दळवी (1) सतीष भिकाजी रणदिवे (1), सुदर्शन लक्ष्मण शितोळे (1), विजय बापुराव जगताप (1) ड. संतोष भाऊसाहेब कांबळे (4) सुभाष दादा त्रिभुवन (2), रामचंद्र नामदेव जाधव (2) चरन दादा त्रिभूवन (2) सुमेध लक्ष्मण पडवळ (2) भाऊसाहेब शंकर पगारे (2) अनिल प्रभाकर भागरे, (2) युवराज धनाजी बागुल (2) अशोक राजराम जगधने (1), भारत संपतराव तुपे (1), 221-नेवासा मतदारसंघात 13 व्यक्तींनी 24 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. शंकरराव यशवंतराव गडाख (4) सुनिता शंकरराव गडाख (2), ज्ञानदेव कारभारी पाडळे (4), एकनाथ बाबासाहेब राऊत (2), मच्छिद्र देवराव मुंगसे (1) निलेश म्हतारदेव कोकरे (1) बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (1) बबन बालाजी कणगरे (1), डेरे भारत रावसाहेब (1), विठ्ठलराव वकीलराव लंगे (2) सचिन रामदास गव्हाणे (2) राजेंद्र एकनाथ निंबाळकर (2) भाऊसाहेब शिवराम जगदाळे (1), 222-शेवगाव मतदारसंघात 11 जणांनी 24 अर्ज नेले. सुनिलराव मोहनराव पाखरे (4), शेख युसुब शब्बीर (3), किसन महादेव आव्हाड (4), सदाशिव सटवाजी शिंदे (2), आव्हाड विजय बाबुराव (1), किसन जगन्नाथ चव्हाण (2), राहुल दामोदर कारखिले (2), धिरज मोतीलाल बताडे (1), संजय साहेबराव आंधळे (1), संजय सुर्यभान लहासे (2), बापूसाहेब पाराजी पाटेकर (2), 223-राहुरी मतदारसंघात 8 जणांनी 10 अर्ज नेले. सुर्यभान शंकर पोटे (1), सत्यजीत चंद्रशेखर कदम (3), विनायक रेवननाथ कोरडे (1), विजय अण्णासाहेब मकासरे (1), रविंद्र जालिंदर माळी (1), बाळासाहेब रंगनाथ चव्हाण (3), 224-पारनेर 8 जणांनी 9 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. 225-अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात पहिल्या दिवशी एकुण 20 लोकांनी 24 अर्ज नेले आहेत. उमेदवारी अर्ज भरुन एकही अर्ज निर्धारित वेळेत (सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत) आलेला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटील यांनी दिली. किरण बन्सी उपकारे (1), डॉ. श्रीधर जाफुजी दरेकर (3), श्रीराम जनार्दन येडे (2), अजय दिलीप गायकवाड (1), अविनाश नारायण ठाणगे (1), नाट राजेंद्र बाळासाहेब (1), रोहन श्रीकांत मांडे (2), बापुसाहेब श्रीधर भास्कर (1), विश्वभुषण किसन गायकवाड (1), रमेश किसनराव शहा (1), संतोष दामोधर घिवर (1), प्रतिक अरविंद वारसे (1), संभाजी अशोकराव कदम (1), रामभाऊ लक्ष्मण कुसकर (1), अजितराव नारायण देवकर (1), सचिन तुकाराम जाधव (1), श्री. सचिन गणेश राऊत (1), लक्ष्मण कुंडलिक पोकळे (1), आदिनाथ भाऊसाहेब कराळे (1), सुधाकर भागुजी कल्हापुरे (1), 226-श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात 21 जणांनी 22 अर्ज नेले. 227-कर्जत-जामखेडमधून 4 जणांनी 12 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. यात प्रसाद ढोकरीकर (03), अरुण डोळस (03), शहाजी काकडे (03) आणि महारुद्र नागरगोजे (03) यांचा समावेश आहे.