Anupam Kher : अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक होण्याची वेळ जवळ आली आहे. सोमवार 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या थाटामाटात होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी अनेक स्तरांतून सुरू असून,
सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उद्या 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात येणार आहे.
उद्या या सोहळ्यासाठी राजकारणी नेत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अयोध्येत उपस्थित असणार आहेत. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर अयोध्येला रवाना झाले आहेत. ज्या दिवसाची एवढी वर्षे वाट पाहिली तो दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी आपल्या इंस्टारग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
अनुपम खेर आज अयोध्येला रवाना झाले आहेत. या व्हिडीओ आणि पोस्टमध्ये त्यांनी राम आणि राम मंदिराबद्दल भाष्य केलं आहे. काश्मिरी पंडितांप्रमाणे पोशाख परिधान करुन ते प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. अनुपम खेर व्हिडीओमध्ये म्हणत आहेत,”जय श्री राम! आज मी अयोध्येला रवाना होत आहे.
View this post on Instagram
मनात खूप विचार सुरू आहेत. भावना व्यक्त करणं कठीण होत आहे. हिंदू आणि प्रभू रामाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. देशभरात राम मंदिराच्या उद्घाटनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. एक दिवस राम मंदिर नक्की होणार, असे माझे आजोबा नेहमी म्हणायचे, काश्मिरी पंडितांचा पोशाख परिधान करुन मी सोहळ्याला उपस्थित असणार आहे.
सर्वत्र ‘जय श्रीराम’चा जयघोष पाहायला मिळत आहे. कारसेवकांसह अनेकांनी ‘या’ दिवसाची प्रतीक्षा केली आहे. या सगळ्यांच्या वतीने मी उद्या पूजा करणार आहे. अश्रू अनावर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप-खूप आभार”. अशी पोस्ट अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केली आहे.