मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
समितीचे उर्वरित दोन सदस्य अनुक्रमे माजी कर्णधार कपिल देव आणि महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी यापूर्वीच आपल्या पदाचे राजीनामा दिलेले आहेत. मंडळाचे अधिकारी डी. के. जैन यांनी काही दिवसांपूर्वी गायकवाड यांना आर्थिक हितसंबंधांच्या मुद्द्यावरून “कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.
भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे संचालक असताना देखील गायकवाड यांनी सल्लागार समितीचे पद कसे काय स्वीकारले, याबाबत या नोटिशीत विचारणा करण्यात आली आहे.